रावेर विधानसभा मतदारसंघातून ‘अपक्ष’ लढणार
उद्योजक श्रीराम पाटील यांनी पत्रकार परीषदेतून फुंकले ‘रणशिंग’
रावेर : विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अवकाश असलातरी रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी रणशिंग फुंकले असून अपक्ष दावेदारी करीत विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे सुतोवाच गुरुवारी पत्रकार परीषद घेत केले आहेत. जनतेने रावेर-यावल मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला एक संधी द्यावी तसेच पुढे माझ्या परीवारातून कोणीही निवडणुकीच्या रींगणात उतरणार नसल्याचे भूमिकादेखील त्यांनी स्पष्ट केली आहे.
लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यास नशीब आजमावणार !
उद्योजक श्रीराम पाटील यांनी मॅक्रो व्हिजन अॅकडमी शाळेत आपल्या कार्यकर्त्यांसह पत्रकार परीषद घेऊन आगामी काळासाठी आपली भूमिका जाहीर केली. रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी ईच्छा आहे. त्यासाठी समविचारी पक्षांशी मी संपर्कात आहे. त्या पक्षाच्या नेत्यांशी बोलणे सुरू आहे. त्या पक्षाने लोकसभेला उमेदवारी दिली तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योजक पाटील पुढे म्हणाले की, रावेर विधानसभा निवडणूक मी लढवावी हे जनतेच्या मनात आहे म्हणून आपण पुढची निवडणूक लढणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास रावेर विधानसभा निवडणूक लढणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी ईच्छा आहे. त्यासाठी समविचारी पक्षांशी मी संपर्कात आहे. त्या पक्षाच्या नेत्यांशी बोलणे सुरू आहे.त्या पक्षाने लोकसभेसाठी जर उमेदवार दिली तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू. दोन्ही निवडणुका एकत्र न झाल्यास आम्ही संपर्कात असलेल्या पक्षाने उमेदवारी दिली तर रावेर लोकसभा निवडणूक लढवेल व उमेदवारी न मिळाल्यास शंभर टक्के रावेर विधानसभा निवडणूक आपण अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, आम्ही रावेर मतदारसंघातील स्थायीक असल्याने सर्व-साधारण जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे.

सर्वांगीण विकासासाठी लढणार
रावेर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझी ब्लू प्रिंटदेखील तयार आहे. मतदार संघात रोजगार उपलब्ध करणे, शेतकर्यांना येणार्या समस्या सोडवणे, नवीन स्टार्टअप उभारणे, रस्ते, यासह अनेक विषयांवर माझी ब्लूप्रींट तयार असून लवकरच मी ते जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने आगामी निवडणुकीत मला एक संधी द्यावी त्यानंतर पुढे माझ्या परीवारातील कोणीही निवडणूक लढणार नाही आणि मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदण्याचे टार्गेट असल्याचे त्यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. यावेळी उद्योजक श्रीराम पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परीषदेला गोपाल दर्जी, पीपल्स बँक संचालक सोपान साहेबराव पाटील, विजय गोटीवाले, अॅड.प्रवीण पाचपोहे, मॅक्रो व्हिजन अॅकडमीचे सचिव स्वप्निल पाटील, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते.
