रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची : आज रेल्वेच्या ब्लॉकमुळे तीन तास विलंबाने धावणार गाड्या
Railway passengers this news is very important for you : trains will run three hours late today due to railway block भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील दुसखेडा स्टेशन येथे यार्ड रीमोल्डींग कामासाठी तसेच अप-डाऊन लूप लाईनच्या कामासाठी शुक्रवार, 25 रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक अप-डाऊन मार्गावर घेण्यात येत असल्याने दोन ते पाच वाजेपर्यंत अप-डाऊन मार्गावरील गाड्या सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ विलंबाने धावणार आहेत. रेल्वे गाड्या बर्हाणपूर, रावेर, सावदा, वाघोडा, भुसावळ, जळगाव स्थानकांवर थांबविण्यात येणार असून प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत. दरम्यान, नांदेड एक्स्प्रेस ही गाडी इटारसी, नरखेड, बडनेरा, अकोलामार्गे वळविण्यात आली आहे.
प्रवासी होणार घामाघूम
दुसखेडा रेल्वे स्थानकाजवळ वाहतूक ब्लॉक दरम्यान गाड्यांचे रेगुलेशन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे गाड्या दोन तासापेक्षा जास्त वेळ थांबविल्या जाणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय होईल. काही गाड्या अत्यंत लहान रेल्वे स्थानकांवर सुध्दा उभ्या केल्या जाणार आहे, यात अप मार्गावरील गाड्यामध्ये सीतापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस सावदा स्टेशन येथे तीन तास थांबविणार आहे. वाराणसी-मैसूर एक्स्प्रेस निंभोरा स्टेशन येथे 2.55 तास थांबविणार आहे. (11072) वाराणसी-लोकमान्य टिळक कामायनी एक्स्प्रेस ही गाडी रावेर स्टेशनवर 2.45 मिनिटे थांबविणार आहे. गोरखपूर-पुणे एक्सप्रेस वाघोडा स्टेशनवर दोन तास थांबवण्यात येणार आहे. अमृतसर-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी बर्हाणपूर स्टेशनवर 1.30 तास थांबणार आहे. (22537) गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस असीरगढ स्टेशनवर एक तास थांबविणार आहे. जयनगर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी चांदनी स्टेशन येथे 50 मिनिटे थांबविणार आहे. कटनी भुसावळ एक्सप्रेस नेपानगर स्टेशनवर 20 मिनिटे थांबवणार आहे.

डाऊन मार्गावरील गाड्या
अप मार्गाप्रमाणेच डाऊन मार्गावरील गाड्यांही भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबविणार आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेस भुसावळ स्टेशन येथे 2.50 थांबेल, लोकमान्य टिळक टर्मिनस दिब्रुगड एक्सप्रेस भुसावळ येथे 1.55 तास थांबेल, मुंबई लखनऊ एक्सप्रेस भुसावळ स्टेशनवर 1.45 तास थांबेल, मैसूर वाराणसी एक्सप्रेस भादली स्टेशनवर 1.40 तास थांबेल, सुरत-छपरा एक्सप्रेस जळगाव स्टेशनवर 1.40 तास थांबेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे केले आहे.
