गोंडगाव घटनेतील नराधमांला फाशीची शिक्षा द्या
सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन
रावेर : गोंडगाव, ता.भडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिची निघर्र्ृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचा रावेर येथे जाहीर निषेध करण्यात आला तसेच नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवदनाद्वारे रावेर तालुका सूर्यवंशी क्षत्रीय मराठा समाजातर्फे रावेर निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष गंगाराम दाणी, उपाध्यक्ष अशोक शिंदे, सचिव श्रीराम पाटील, दिलीप पाटील, राजेश शिंदे, ज्ञानेश्वर महाजन, शालिक महाजन, सुभाष शिंदे, दिलीप गायकवाड, मिलिंद महाजन, भावलाल महाजन, अशोक गायकवाड, सुनील महाजन, मुकेश पाटील, मधुकर शिंदे, विजय महाजन, दीपक शिंदे, धनराज महाजन, पिंटू महाजन, बापू महाजन, सदाशीव पाटील, धनराज महाजन, उमाकांत महाजन, दीपक शिंदे, पुष्पराज महाजन, ज्ञानेश्वर पाटील, माधवराज राऊत, शिवलाल शिंदे, ईश्वर शिंदे, मनोज पाटील, अशोक महाजन, अनिल महाजन, भूषण महाजन, हर्षल गायकड, योगेश शिंदे, सीमा दाणी, पूजा महाजन, संगीता गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते

