भुसावळातील रहिवाशांच्या समस्या जाणण्यासाठी प्रशासकांनी कॉलनीत रहावे

शिशिर जावळे यांचे आवाहन : निवासस्थाची व्यवस्था करणार


Administrators should stay in the colony to know the problems of Bhusawal residents
भुसावळ :
शहरातील मूलभूत समस्या सुटत नसतानाच सर्वाधिक गंभीर समस्या पाण्याची बनली आहे. पालिकेवर दोन वर्षांपासून प्रशासकराज असून नागरीकांच्या समस्या जलदगतीने सुटण्यासाठी व नागरीकांचे नेमके काय हाल होतात हे जाणून घेण्यासाठी प्रशासक जितेंद्र पाटील यांनी नागरी वस्तीत राहण्यासाठी आल्यास त्यांना निवास उपलब्ध करून देवू व त्याचे भाडेदेखील आम्ही भरू मात्र त्यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे आवाहन भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केले आहे.

तर नागरीकांच्या सुटतील समस्या
नाशिक विभागात भुसावळ पालिका एकमेव ‘अ; वर्ग आहे. नागरीकांना आतापर्यंत मुलभूत सेवा-सुविधा पुरवण्यासाठी असमर्थ ठरलेल्या पालिकेविषयी नागरीकांमध्ये प्रचंड रोष आहे. पाणी प्रश्न असो वा तुटलेल्या गटारी, खराब रस्त्यांचा विषय असो, किंवा स्ट्रीट लाईटचा विषय असो या समस्या आ वासून शहरात उभ्या आहेत. खड्ड्यांचे शहर म्हणून भुसावळ शहराला सर्वत्र हिनवले जात असताना आता 15 दिवस उलटूनही पाणी येत नसल्याने जनभावना तीव्र झाल्या आहेत. भुसावळ नगरपालिकेकडून नागरीकांना पुरविण्यात येणार्‍या अपुर्‍या मूलभूत सेवा सुविधांबाबत अनेकदा आंदोलन झालीत, आरोप झाले, नागरीक रस्त्यावरही उतरले मात्र प्रश्न जैसे थे आहेत.

मूलभूत सेवा सुविधांच्या हक्कासाठी नागरीक लढाई करीत आहे मात्र असे असताना पालिका प्रशासन या समस्या सोडवण्यास सपशेल अपयशी ठरल्याने आता प्रशासकांनी प्रभाग क्रमांक 22 मधील नागरीकांमध्ये राहण्यासाठी यावे व समस्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी व्यक्त केली आहे. प्रशासकांच्या राहण्यासाठीचा निवास खर्च नागरीक लोकवर्गणीतून करतील मात्र प्रशासकांनी समस्या जाणून त्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षाही जावळे यांनी व्यक्त केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !