शिक्षण विभागाच्या अजब कारभाराचे आश्चर्य

रात्रीच्या संदेशानंतर हवी त्वरीत माहिती : धमकीच्या भाषेचा निषेध


The wonder of the strange administration of the Education Department भुसावळ :जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नुकतीच रात्रीच्या सुमारास माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी शाळेतील अतिरीक्त शिक्षकांची माहिती विशिष्ट नमुन्यात, हार्ड कॉपीसह लागलीच दुसर्‍या दिवशी दिलेल्या फर्मानाबाबत शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.ज्यांची माहिती मिळणार नाही किंवा अपूर्ण असेल त्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व पगाराची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची राहणार असल्याची चक्क धमकी दिल्याने या प्रकाराविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांविषयी संताप
सर्वच मुख्याध्यापक रात्री मोबाईल पाहतील याची शाश्वती नाही शिवाय काही कामानिमित्त गावाला असतील, आजारी आजारी असतील, रजेवर असतील त्यांनी ही सूचना कशी अमलात आणावी? असा प्रश्न आहे. पत्रक काढण्यापूर्वी हे अधिकारी आपण कोणती माहिती मागतोय, ती मुख्याध्यापक एवढ्या तत्परतेने देवू शकतात का? ती बाब त्यांच्या अधिकारात तरी आहे का? ह्या सामान्य बाबींचा विचार करीत नाहीत का? असा प्रश्न दलाल यांनी विचारला आहे. कोणताही शिक्षक अतिरीक्त ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना नाही तर व्यवस्थापक वर्गाला आहे त्यासाठी त्यांची सभा होणे, ठराव होणे त्या शिक्षकाला अवगत करणे, त्याचे आक्षेप असल्यास त्यावर निर्णय घेणे,अपील ई.कार्यपद्धती कायद्यानेच सांगितली आहे मग हे सर्व प्रक्रिया एका रात्रीत कशी पूर्ण करणार? असेदेखील दलाल यांनी विचारले आहे. मुख्याध्यापक हे प्रशासन अधिकारी असून त्यांना धमकीची भाषा वापरू नये, अशी अपेक्षा माध्यमिक शिक्षकांधिकार्‍यांकडे ज्येष्ठ शिक्षक नेते व भाजप शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारीणी सदस्य प्र.ह.दलाल यांनी व्यक्त केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !