वरणगाव नगरपरीषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे आामदारांना निवेदन

मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक लावण्याचे आमदार पाटील यांचे आश्वासन


Warangaon Municipal Council’s Anti-Immigration Action Committee’s statement to the voters वरणगाव : नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे नगरपरीषद स्थलांतरला विरोध दर्शवणयात आला असून गावातील पाच हजार नागरीकांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन शनिवार, 26 रोजी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावण्याचे कृती समितीला आश्वासन दिले.

गावात राहू द्यावे वैभव
निवेदनाचा आशय असा की, वरणगाव नगरपरीषदेची इमारत ही इतिहासकालीन आहे. गावात एकमेवशासकीय वास्तू असल्याने 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी बसस्थानकातून विद्यार्थ्यांची शाळेची प्रभात फेरी गावात नगरपरीषदेजवळ आल्याने या ठिकाणी नगरपरीषदेवर असलेल्या तिरंगा राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन विद्यार्थी पुढे मार्गक्रमण करतात. हा संपूर्ण क्षण गावातील नागरीकांसाठी स्फुरण आणि ऊर्जा देणारा असतो. सामान्य महिला, नागरीक या गावात मध्यभागी असलेल्या नगरपरीदषद इमारतीत सहज आपली मूलभूत समस्या घेऊन जातो. गावातून ही इमारत दुसरीकडे गेल्यास नागरीकांना खूप मोठा मनस्ताप होईल. गावाचे वैभव असलेली एकमेव नगरपरीषद इमारत गावातच राहू द्यावी. जेणेकरून गावाचे वैभव गावातच टिकून राहील, असेही आमदार चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

यांची निवेदन देताना उपस्थिती 
निवेदन देतेवेळी नगरपरीषद स्थलांतर विरोधी कृती समितीचे उपाध्यक्ष अश्फाक काझी, सचिव महेश सोनवणे, सहसचिव संतोष माळी, सदस्य शशिकांत चौधरी, सुनील भोई, संदीप वाघ, प्रकाश मराठे आदी उपस्थित होते. दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना वरणगाव नगरपरीषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे निवेदन दिल्यानंतर कृती समिती सदस्यांनी गावातून नगरपरीषद स्थलांतर झाल्यास नागरीकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आणून दिले. संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तुम्ही कृती समितीचे सदस्य मुंबईला या, तुमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन आपन चर्चा करून योग्य मार्ग काढू, असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !