तडीपारीची कारवाई न करण्यासाठी शिर्डी पोलीस निरीक्षकांच्या नावाने मागितली एक लाखांची : हवालदार नाशिक एसीबीच्या जाळ्यात


One lakh was demanded in the name of Shirdi police inspector for not taking action: Constable Nashik in ACB’s net शिक : तडीपारीसह एमपीडीएची कारवाई टाळण्यासाठी शिर्डी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या नावाने एक ते दिड लाखांची लाच मागणी करून तडजोडीअंती 30 हजारांची लाच शनिवारी स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याप्रकरणी शिर्डी पोलीस हवालदार संदीप गडाख (40) यास नाशिक एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षकांच्या लाच प्रकरणामुळे अडचणी वाढल्या आहेत.

संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
नाशिकमधील 27 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्याविरोधात विनयभंगाच्या गुन्ह्यात तपासात मदत करण्यासह तडीपारी व एमपीडीएची कारवाई टाळण्यासाठी 15 जून रोजी हवालदार संदीप गडाख यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या नावाने एक ते दिड लाखांची लाच मागितल्याने तक्रार नोंदवण्यात आली मात्र लाच रकमेत तडजोड होवून 30 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर 30 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले मात्र शनिवार, 26 रोजी ट्रॅपचा संशय आल्याने आरोपीने लाच रक्कम स्वीकारली नाही.

पोलीस निरीक्षकांच्या वाढल्या अडचणी
शिर्डीतील पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या लाच प्रकरणामुळे अडचणी वाढल्या आहेत. नुकताच निरीक्षकांचा अपघात झाल्याचीदेखील माहिती आहे. दोन दिवसात एसीबीकडून या प्रकरणी कारवाई होण्याचे संकेत सूत्रांनी दिले. हवालदार संदीप गडाख यास अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !