ई पीक पाहणीच्या तांत्रिक अडचणी दूर : अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश


हिंगोणा : शासनाने शेतकर्‍यांसाठी ‘माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ या महत्त्वाकांची योजनेची सुरुवात केली आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना आपल्या स्वतःच्या मोबाईलमधून पीक पाहणी करावयाची आहे. पीक पाहणी करण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या फेर्‍या मारण्याची आता गरज राहिलेली नाही परंतु या पीक पाहणी अ‍ॅपमध्ये काही दिवसापासून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना पीक पाहणी करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. सर्वरचा वेग कमी असल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांची आतापर्यंत पीक पाहणी राहिली होती त्यामुळे भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तांत्रिक अडचणी दूर करून पीक पाहणीची मुदत वाढवून देण्यात येण्याची मागणी केली. त्यावर तांत्रिक अडचणी दूर करून पीक पाहण्याची मुदत वाढवून देण्यात आली. याचा जिल्ह्यातील ज्या शेतकर्‍यांची पीक पाहणी बाकी असेल त्या सर्व शेतकर्‍यांना लाभ होणार आहे तसेच ‘दैनिक तरुण भारत’ने सुद्धा याबाबत वृत्त प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !