कंडारीतील हत्याकांडातील महिलांनी केली पोलिसांकडे संरक्षणाची मागणी


The women in the Kandari massacre demanded protection from the police भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील दोघा भावंडांसह एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या हत्याकांडप्रकरणी शहर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून मयत झालेल्या पुरूषांच्या घरी मध्यरात्री काही संशयित दरवाजा ठोठावत असल्याची तक्रार महिलांनी मंगळवारी शहर पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्याकडे केली. धमकी देणार्‍यांचा तातडभने बंदोबस्त करावा तसेच संरक्षण द्या, अशी मागणी मृत साळुंखे कुटुंबाकडून करण्यात आली.

दरवाजा ठोठावला तसेच फोनवर दिली धमकी
कंडारी येथील शांताराम साळुंखे व त्यांचा सख्खा भाऊ राकेश साळुंखे तसेच त्यांचा मित्र रमेश इंगळे यांच्या हत्येनंतर मृत शांताराम व राकेश यांच्या कंडारी येथील घरी सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच संशयितांनी घराजा वाजवला तसेच या प्रकरणात अटक असलेल्या संशयीताच्या नातेवाईकाने साळुंखे यांच्या मोबाईलवर फोन करून मारून टाकण्याची धमकी दिल्याचे महिलांनी पोलीस निरीक्षकांना यावेळी सांगितले. घरात कोणीही पुरूष नाही, महिलाच घरात असल्याने संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. हत्याकांडात मृत रमेश इंगळे यांची पत्नी यांनी पोलिसांना सांगितले की, या प्रकरणात माझ्या नवर्‍याचा काय दोष होता, त्यालाही मारून टाकण्यात आले, त्याला लहान -लहान मुले आहेत. हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !