निश्चित ध्येय, कठोर परिश्रम व प्रयत्नांतील सातत्य हीच यशाची त्रिसूत्री : कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत
फैजपूर : आयुष्यातील कोणतेही ध्येय प्राप्त करणे सहज शक्य आहे. त्यासाठी आपली क्षमता व कल बघून ध्येय निश्चिती करावी तसेच अचूक मार्गदर्शनाच्या बळावर कठोर परीश्रम व अपयश जरी आले खचून जावू नये तसेच प्रयत्नांची पराकाष्टा करीत राहिल्यास कोणतेही ध्येयप्राप्ती शक्य आहे. आदिवासी तडवी भिल समाजातील तरुण-तरुणींमध्ये प्रचंड शारीरीक व मानसिक क्षमता असून अंगी असलेल्या क्षमतांचा योग्य वापर केल्यास वैयक्तिक जीवनासोबतच पारीवारिक उथ्थान व समाज उभारणी होईल, असे मत कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले. पाल येथे आदिवासी तडवी भिल समाज कृती समितीच्या वतीने आयोजित ‘युवा नेतृत्व विकास शिबिरात’ ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक आयुक्त बाबू हमीद तडवी, पाल सरपंच हाजीरा तडवी, कामील तडवी, अशोक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. 2 व 3 सप्टेंबर रोजी पंचक्रोशीतील तरुणांसाठी आदिवासी तडवी भिल समाज कृती समितीच्या वतीने युवा नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते माजी आमदार जालमखा संडेबाज तडवी, सातपुड्याचा वाघ रमजान सरदार तडवी, जननायक रॉबीन हूड, तंट्या मामा भिल, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा, थोर स्वातंत्र्य सेविका मीराबाई तडवी या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक अजित तडवी यांनी केले. पहिले व्याख्यान ध्येय निश्चिती व सकारात्मक दृष्टिको* या विषयावर नाशिक आयुक्त बाबू हमीद तडवी यांनी केल.े द्वितीय सत्रात धनाजी नाना महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक तथा असोसिएट एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ.राजेंद्रसिंह राजपूत यांनी स्पर्धा परीक्षांची यशस्वी शिखरे गाठण्यासाठी युवकांनी कशाप्रकारे तयारी करावी या विषयावर संवाद साधला.

