भुसावळात बसस्थानकाच्या संपर्क मार्गात रेल्वेने उभारली अडचणीची भिंत
रेल्वेसह बस प्रवासांची प्रचंड गैरसोय : लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची मागणी
A barrier wall has been erected by the railways in the connecting route of the bus station in Bhusawal भुसावळ : रेल्वे स्थानकाबाहेर आलेल्या प्रवाशाला बसस्थानकात येण्यासाठी असलेल्या सोयीच्या मार्गावरच रेल्वेने भिंत उभारून रस्ता बंद करण्याचा घाट घातल्याने रेल्वे व एस.टी.च्या प्रवासीवर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. आधूनुकीकरणाच्या नावाखाली भिंत उभारण्यात येत असल्याचे सांगितले जात असलेतरी यामुळे आता प्रवाशांना आता फेर्याने बसस्थानकात यावे लागणार आहे वा फेर्याने रेल्वे स्थानकात प्रवेश करावा लागणार आहे.
सुरक्षा बलाच्या गराड्यात भिंती उभारणीचे काम
विशेष म्हणजे हे काम करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचा बंदोबस्त लावण्यात आला असून त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या आडमुठे धोरणाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पूर्वी बसस्थानकात जळगाव अथवा मलकापूरकडे जाणारी बस मिळाली नाही तर प्रवासी तात्काळ एका मिनिटात रेल्वे स्थानकात जात होते मात्र आता भिंत बांधल्याने प्रवाशांना फेरा पडणार आहे. आबालवयोवृद्धांसह महिलावर्गाची त्यामुळे अधिक गैरसोय होणार असून लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची अपेक्षा आहे.








