यावल शह रवंचित बहुजन व आदिवासी एकता परीषदेच्या मोर्चाने दणाणले
यावल : यावल तहसील कार्यालयावर पंचायत समितीपासून ते थेट तहसील कार्यालयापर्यंत वंचित बहुजन आघाडी व आदिवासी एकता परीषदेच्या वतीने मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातून विविध घोषणा देत निघलेल्या या पायी मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. तहसील कार्यालयात विविध मागण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. काही मागण्या संदर्भात चर्चा तहसीलदारांनी तातडीने कारवाईच्या सूचना केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावल येथील तहसील कार्यालयावर मंगळवारी यावल पंचायत समितीपासून मोर्चा काढण्यात आला. आदिवासी एकता परीषद व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी एकता परीषदेचे सुनील गायकवाड व वंचित बहुजन आघाडीच्या शामीभा पाटील यांनी केले.
या मागण्यांसाठी मोर्चा
विराट मोर्चात मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधवांची सहभागी झाले होते. अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरून विविध घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने नागरीकांचे लक्ष वेधले. तहसील कार्यालयात मोर्चा पोहोचल्यानंतर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी मणिपूर व एरंडोल तालुक्यातील खडके बाल वस्तीगृहातील आदिवासी मुलींवर व महिलांवर अत्याचाराच्या घटनेचा निषेध केला तसेच समान नागरी कायदा लागू करू नये, अशी मागणी केली.

या मागण्यांसाठी मोर्चा
जळगाव जिल्ह्यातील भूमीहीन दारीद्य्र रेषेखाली आदिवासी बांधवांना स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत जमीन वाटपाचा लाभ देणे, यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये आदिवासी भील समाजाला दफनभूमीसाठी जमीन देणे, आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्तीला मंजुरी देऊन जागा त्यांच्या नावे करणे, आदिवासी गरजूंना शिधापत्रिका असून त्यांना धान्य देणे, चिपखेडा गावात अंगणवाडी उभारणे, गरजुंना रेशन कार्ड देणे, शहर आणि ग्रामीण भागातील अवैद्य धंदे बंद करणे, ग्रामपंचायतच्या 14 व 15 वित्त आयोगांमधून मागासवर्गीयांसाठी 20 टक्के निधी खर्च न करणार्यांवर कारवाई करणे, आदिवासी बांधवांना घरकुल मंजूर करून त्याचा लाभ देणे तसेच 2001 पासून सरकारी व गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांची अतिक्रमण तसेच जमीन करणार्यांचे आदीवाशांच्या जमीनवर पिक पेरे लावण्याचे आदेश करण्यात यावे आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला व मागण्यांबाबत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी बर्याचशा मागण्या आपल्या पातळीवर सोडवण्याच्या सूचना केल्या व नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात वंचितच्या शमीभा पाटील, सुनील गायकवाड, यशवंत अहिरे, धनराज भिल, महेंद्र मोरे, भिका भिल, देविदास भिल, अशोक भिल, दगडू भिल, अनिल भिल, देविदास बागुल, लक्ष्मण भिल, मुखीराम बारेला, योगेश सोनवणे, विजय सोनवणे, सदाशिव भिल, भास्कर भिल, देविदास भिल, संजय भिल, सुभाष भिल, रमेश भिल सह मोठ्या संख्येत आदिवासी समाजबांधव सहभागी झाले.

