ग्रामविकास मंत्री गिरीष महाजनांचे आदेश : पूरामुळे बाधीत शेताच्या बांधावर जावून पंचनामे करा


जळगाव : तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत शेतपिकांची तत्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी, रावेर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. मध्यप्रदेशातील पावसामुळे तापी नदीच्या जलपातळीत झालेल्या वाढीमुळे हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने तसेच तापी नदीचे बॅकवॉटर नदीकाठच्या गावातील शेत पिके व घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. या गावातील 67 कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्याचे काम करण्यात आले. तलाठी, महसूल सहायक यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री महाजन यांनी दिल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !