चाळीसगाव तालुक्यात पूर संरक्षक भिंतीसाठी 26 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे मंत्री अनिल पाटील यांचे आश्वासन

चाळीसगावचे आमदार दमदार : आमसभेतून लावला मंत्री अनिल पाटील यांना फोन : भरपाईचे मिळाले आश्वासन


Minister Anil Patil’s assurance to approve the 26 crore proposal for flood protection wall in Chalisgaon taluka चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्याची आमसभा तब्बल 12 वर्षानंतर सोमवारी शहरात पार पडली. यावेळी नागरीकांनी विविध प्रश्न मांडले. चाळीसगाव तालुक्यात पाच वेळा महापूर आल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नसल्याचा प्रश्न शेतकर्‍याने मांडल्यानंतर मदत व पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना सभेतून आमदार मंगेश चव्हाण यांनी फोन लावला.

चाळीसागावात पाच वेळेस महापूर आल्यानंतर गुरे-ढोरे दगावली, शेतीचे नुकसान मात्र भरपाई मिळाली नसल्याचे आमदारांनी यावेळी सांगितल्यानंतर मंत्री पाटील यांनी भरपाईचे आश्वासन दिले. पूर संरक्षण भिंत हव्या असून त्यासाठी 25 कोटी 74 लाख 22 हजारांच्या प्रस्ताव मंजुरी देण्याची विनंती आमदार चव्हाण यांनी यावेळी केल्यानंतर मंत्री पाटील यांनी प्रस्ताव मंजुरीचे आश्वासन दिले. जळगावात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याचे तसेच मुंबईत बैठक घेणार असल्याचे मंत्री पाटील म्हणाले.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !