फळ पीक विम्याची तत्काळ भरपाई द्यावी : खासदार रक्षा खडसेंची मागणी


Immediate compensation for fruit crop insurance: MP Raksha Khadse’s demand मुक्ताईनगर : पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना आंबीया बहार अंतर्गत मागील नुकसानीचा शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला मिळण्यासाठी महाराष्ट्र शासन अधिकारी तथा संबंधीत विमा कंपनीस तत्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्याकड केली. संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान नवी दिल्ली येथे त्यांनी ही भेट घेतली. पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील संबंधित अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधीसह नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करून केळी उत्पादकांना न्याय देण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिले.

गैरव्यवहाराच्या तक्रारीनंतर लाभ थांबवला
जळगाव जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना आंबिया बहार योजना राबवतांना विमा कंपनी प्रतिनिधीमार्फत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शेतकर्‍यांची तक्रार असतांना काही स्थानिक लोकप्रतिनिधीद्वारे याबाबत शासन स्तरावर चौकशीची मागणी करण्यात आली होती. यावर शासनातर्फे यार बाबतीत चौकशी करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले व तोपर्यंत सर्व शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी मार्फत थांबविण्यात आली आहे.

तत्काळ भरपाईची केली मागणी
सध्या संपूर्ण जळगांव जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परीस्थिती उद्भवली असून, शेतकर्‍यांचे पीक वाया जाण्याची शक्यता आहे. आधीच केळी उत्पादक शेतकर्‍यांना पीक विम्याचा मोबदला मिळालेला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहेत. आता शेतकर्‍यांनी नुकसान झाल्यानंतर दुसर्‍या पिकाची पेरणी केलेली असून शासनामार्फत वरील तक्रारीपोटी कशाची चौकशी करण्यात येणार आहे असा प्रश्न आहे. केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजना आबिीया बहारचा मागील नुकसानीचा शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला मिळण्याबाबत, संबधितांना तत्काळ आदेश देण्याची मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्याकडे केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !