नेत्रतज्ज्ञ डॉ.नि.तु.पाटील यांचा मुंबई पश्चिम आयएमच्या वतीने सन्मान
गणेश भक्तांची देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी ; शिवबा मंडळाने टाकाऊ वस्तूंपासून बनविले रॉकेट यान
भुसावळ : नर्मदा परीक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे राज्यातील प्रथम आयएमए सदस्य तथा ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ.नि.तु.पाटील यांना मुंबई पश्चिम आयएमएच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पश्चिम आयएमएच्या शाखेने केला गौरव
डॉ.नि.तु.पाटील यांनी अतिशय खडतर समजली जाणारी नर्मदा परीक्रमा यात्रा ही यशस्वीपणे पूर्ण केली आहे, अशी कामगिरी पार पाडणारे ते राज्यातील प्रथम वैद्यकीय व्यावसायीक ठरले असून राज्य आयएएमने याला प्रमाणित केले आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा ठिकठिकाणच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखांच्या मार्फत गौरव करण्यात येत आहे. या अनुषंगाने मुंबई पश्चिम येथील आयएमएच्या शाखेने त्यांचा रविवारी हृदय सत्कार केला. माँ नर्मदा माता परीक्रमा यशस्वी पूर्ण झाल्याबद्दल आयएमए, मुंबई पश्चिम शाखेतर्फे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद अग्रवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.जयेश लेले, शाखा अध्यक्ष डॉ.शोभा आहुजा व सचिव डॉ.रश्मी मेहता यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.


