भुसावळात नाभिक समाजाने दिली मोफत दाढीची सलून सेवा
Free beard salon service provided by Nabhik Samaj in Bhusawal भुसावळ : पी. एम. विश्वकर्मा योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाभिक समाजाच्या कौशल्याची दखल घेऊन नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाच्या विचार भारत सरकारच्या पोस्टच्या तिकिटावर करून त्याचे अनावरण केले. त्याबद्दल भुसावळ शहर नाभिक संघाने शनिवारी नाहाटा महाविद्यालय चौफुलीवर सकाळी 10 ते 12 या वेळेत मोफत दाढीची सेवा दिली. यासोबत आतषबाजी करीत मिठाई वितरीत करुन आनंद व्यक्त केला.
मिठाई वाटप करीत जल्लोष
आमदार संजय सावकारे, नाना चित्ते, उदय सोनवणे, भिका बाणाईत विनोद बोरनारे आदींच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात सर्व समाजाने या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन आमदार सावकारे यांनी केले. यावेळी डॉ.नरेंद्र महाले, सचिन सोनवणे, संजय बोरसे, अनिल टोंगे, चित्रा सोनवणे, शोभा निकम, प्रशांत बाणाईत, गिरीश पगारे, विनोद आंबेकर, शांताराम सोनगिरे, पंडित सनंसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


