‘त्या’ लॉकअप गार्ड पोलिसाचा अखेर मृत्यू : पोलिसांनी दिली मानवंदना


लातूर : पोलिस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग शंकरराव पिटले (वय 50) यांनी गांधी चौक ठाण्यात लॉकअप गार्ड म्हणून कर्तव्यावर असताना शुक्रवारी डोक्यात गोळी मारल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस दलातर्फे त्यांना लापूर शहरातील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात पिटले कार्यरत होते.

कारण अद्यापही अस्पष्ट
शुक्रवारी रात्री कर्तव्यावर असताना पिटे यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला व खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.






त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी डीवायएसपी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश मोकाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !