बैलगाडीवरून चक्कर येवून पडल्याने शेतकर्याचा मृत्यू
जळगाव : शेतात जात असताना अचानक चक्कर आल्याने नशिराबाद येथील शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे रविवारी घडली. याप्रकरणी सोमवार, 25 सप्टेंबर रेाजी रात्री दीड वाजता नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संदीप नरोत्तम महाजन (45, नशिराबाद, ता.जि.जळगाव) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
संदीप महाजन हे आपल्या परीवारासह नशिराबाद येथे वास्तव्याला होते. रविवार, 24 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास ते बैलगाडीने त्यांच्या शेतात जात असतांना रस्त्यावर अचानक त्यांना चक्कर आले व खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत सोमवार, 25 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास महिला पोलीस नाईक सुनीता लेले करीत आहे.




