भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी : दुचाकी चोरी करणारे त्रिकूट चोरीच्या नऊ दुचाकींसह जाळ्यात


Big achievement of Bhusawal market police: Trio of two-wheeler thieves nabbed with nine stolen two-wheelers भुसावळ  : बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली असून दुचाकी चोरणार्‍या त्रिकूटाच्या मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून भुसावळ बाजारपेठ आणि फैजपूर पोलीस ठाणे हद्दीतील चोरलेल्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मोईद शेख अजीज (25, खडका रोड, भुसावळ), शेख रेहान शेख रशीद (28, रा.अयान कॉलनी, गेट क्रमांक दोन, रेणुका माता मंदिराजवळ, भुसावळ) व सैय्यद अक्रम सैय्यद हातम (23, माटरागाव, ता.शेगाव, जि.बुलढाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने संशयितांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दिले होते. या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागाीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाण यांच्या सुचनेनुसार डीबी पथकाने त्रिकूटाला बेड्या ठोकत त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या. जप्त दुचाकींमध्ये बाजारपेठ हद्दीतील चार, शहर हद्दीतील दोन व फैजपूर हद्दीतील तीन दुचाकींचा समावेश आहे.




यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार सुनील जोशी, हवालदार सुनील विजय नेरकर, हवालदार सुनील रमण सुरळकर, हवालदार यासीन पिंजारी, हवालदार महेश चौधरी, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार निलेश चौधरी, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी, प्रशांत सोनार, प्रणय पवार आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !