भुसावळ रेल्वे विद्युत इंजिन कारखान्यात 15 डिसेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन
Organized Pension Court on December 15 at Bhusawal Railway Electric Engine Factory भुसावळ : शहरातील विद्युत इंजिन कारखान्यात (पीओएच) निवृत्त रेल्वे कर्मचार्यांना अंतिम रक्कम (भुगतान) न मिळाल्याबाबतच्या प्रश्नावर विचार व चर्चा करण्यासाठी 15 डिसेंबर 2023 सकाळी 11 ते 1 वाजेपर्यत पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
तक्रारदारांना तक्रार करण्याचे आवाहन
संबंधित निवृत्त कर्मचार्यांनी त्यांची काही तक्रार असल्यास अर्ज 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुख्य कारखाना प्रबंधक विद्युत इंजिन कारखाना येथील कार्यालयात तीन प्रतीसह जमा करावे अथवा पाठवावे. अर्जात खालील बाबीचा उल्लेख असणे आवश्यक आहे. सेवानिवृत्ती कर्मचार्याचे पूर्ण नाव आणि पत्ता, सेवानिवृत्तीच्या वेळी असलेला हुद्दा, सेवा निवृत्तीची तारीख आणि कारण, समस्या विषयी संक्षिप्त तपशील, बँकेचे नाव व खाते क्रमांक आयएफएससी नंबर, अंतिम वेतन आणि वेतनमान, पीपीओ क्रमांक, टोकन नंबर व पीएफ नंबर, पॅन व मोबाइल नंबर, आधार कार्ड नंबर असावा तरी ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी अर्ज करावे, असे आवाहन कारखान्यातर्फे केले आहे.
