भुसावळ पालिकेच्या ‘त्या’ निविदेला अखेर मुदतवाढ ; अटी, शर्ती कायम
Bhusawal Municipality’s ‘that’ tender finally extended ; Terms, conditions remain
भुसावळ : भुसावळ पालिका प्रशासनाने विविध नागरी दलितेतर योजनेतंर्गत रस्ता काँक्रीटीकरण, पेव्हरब्लॉक बसविणे व अन्य कामांसाठी निविदा काढल्या होत्या. यातील निविदेत टाकलेल्या अटी व शर्ती या केवळ मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी असल्याने त्या तातडीने रद्द कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक धांडे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. या प्रकरणी निविदेला तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असलीतरी अटी, शर्ती कायम ठेवण्यात आल्याआहेत.
तक्रारीनंतर निविदेला मुदतवाढ
भुसावळ नगरपालिकेने शहरातील विविध कामाच्या निविदेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्देशित केलेल्या नियमांचे उलंघन केलेले आहे. पालिकेने काढलेल्या पाच कामांच्या निविदेत केवळ सात दिवसांचा कालावधी देऊन प्रसिद्ध केली. या सोबतच भुसावळ शहराच्या 15 कि.मी परसरातील स्व: मालकीचे किंवा भाडेतत्त्वावर आरएमसी प्लाँट असावा. सोबतचा करारनामा व मनुष्यबळ असल्याची अट टाकण्यात आली आहे. यासह अन्य अटी रद्द कराव्यात व मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष दीपक धांडे यांनी केली होती.
या प्रकरणात पालिकेने निविदांना 7 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे मात्र पूर्वीच्या अटी व शर्ती कायम ठेवल्या आहेत. शासन निर्णय 18 ऑक्टोंबर 2022 नुसार 1.50 कोटीच्या कामापर्यंत कोणत्याही प्लांटची किंवा मशिनरीची अट टाकण्यात येत नाही. निविदेत अट क्र. ( छ )ही अत्यंत गंभीर व गोपनीयतेची नियमांचा भंग करणारी आहे. यात नगर अभियंता सोबतचा ठेकेदाराने स्थळ पाहणीची जीपीएस फोटो काढणे अनिवार्य आहे म्हणजे निविदा भरणे अगोदरच स्वतः ची माहिती व गोपनीयता जाहीर करण्यासारखे आहे. यामुळे या सर्व अटी रद्द कराव्यात, अशी मागणी दीपक धांडे यांनी लावून धरली आहे. जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणी पालिकेने आपल्या स्तरावरुन शासन निर्णय, परिपत्रके आदींचे अवलोकन करुन उचीत कार्यवाही करण्याचे नगरविकास शाखाचे सह आयुक्त जनार्दन पवार यांनी पालिकेला दिले आहेत.
