भुसावळातील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या
Married woman commits suicide by hanging herself in Bhusawal भुसावळ : शहरातील एम.आय.डी.सी.जवळील राधाकृष्ण हॉटेल मागील रहिवाशी कोमल राहुल परदेशी (25) यांनी शुक्रवार, 6 रोजी सकाळी 11.10 वाजता गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कोमल परदेशी या विवाहितेने शुक्रवारी सकळी 11.10 वाजेच्या सुमारास घरात कुणी नसताना राहत्या घरातील छताच्या पंखा अडकविण्याच्या कडीला साडीने गळफास घेतला. हा प्रकार कुटूंबियांच्या लक्षात येतात त्यांनी आरडा-ओरडा करीत विवाहितेला रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी करीत आहेत.


