लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर मार्गावर वन वे स्पेशल रेल्वे धावणार
भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर एकेरी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रविवार, 8 ऑक्टोंबर रात्री 10 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सोमवारी दुपारी 1.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा येथे थांबेल. या गाडीला एकूण 18 कोच असून यात एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 7 शयनयान आणि 7 सामान्य द्वितीय श्रेणींचे सामानसह गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
