यावलमधील विस्तारीत कॉलनी भागात पाणीपट्टीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वसुली ः माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची तक्रार


Illegal collection in the name of water lease in extended colony area in Yaval: Complaint of former mayor Atul Patil यावल : शहरातील विस्तारीत कॉलनी भागातील नागरीकांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वसुली केली जात असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे. नळ जोडणी वेळी वसुल केलेली पाणी पट्टीची रक्कम या वर्षी देण्यात आलेल्या पाणी पट्टी बिलात समायोजन करावे, अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

पाणी न आल्याने कर न आकारण्याची केली होती मागणी
शहरातील विस्तारीत कॉलनी भागात नगरपरीषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्हावा म्हणून तडवी कॉलनी भागात दहा लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला आहे. विस्तारीत भागात वितरण व्यवस्थेसाठी पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आलेली आहे. पाणी मिळण्याच्या आशेने कॉलनी भागातील लोकांनी नगरपालिकेकडे अधिकृत रक्कम भरणा करून नळ जोडणी केली आहे. नळ जोडणी घेत असताना नळ धारकांनी आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क भरणा केल्यानंतरच नगरपालिकेतर्फे नळ जोडणी दिली जाते. मार्च 2022 पर्यंत पाईपलाईनद्वारे घेण्यात आलेल्या नळ धारकांना पाणीपुरवठा झालेला नव्हता म्हणून अशा 328 नळ धारकांना पाणीपट्टी आकारण्यात येऊ नये, अशी मागणी विस्ताराीत भागातील रहिवासी व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली होती व ती मागणी मंजूर देखील करण्यात आली होती

कर निर्धारण विभागाचा भोंगळ कारभार
मागील वर्षी नवीन नळ धारकांना कुठलीही पाणीपट्टी न आकारता यावल नगरपालिकेने दिलासा दिला होता मात्र यावर्षी म्हणजे सन 2023-24 च्या नगरपालिकेने पाठवण्यात आलेल्या पाणीपट्टी बिलाचे अवलोकन केले असता मागील वर्षाची थकबाकी पंधराशे रुपये व व्याज 120 रुपये असे एकूण मागील थकबाकी रक्कम एक हजार 620 रुपये मागील बाकी या सदराखाली बिल पाठवत मागणी केली आहे. मागील वर्षी अतुल पाटील यांच्या मागणीनुसार चौकशी होऊन सदरची पाणीपट्टी जी नगरपरीषदेने स्वरूपात घेतली होती ती समायोजित करण्याबाबत प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मान्य करून तसा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठवला होता. असे असताना देखील नगरपरीषदेच्या कर निर्धारण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विस्तारित भागातील नळ धारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तर जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागणार
यावल नगरपालिकेने नुकतेच चालू वर्षाचे पाणीपट्टी बिलाचे वितरण विस्तारित भागातील नागरीकांना केलेले असून त्यामध्ये मागील वर्षाची थकबाकी या सदराखाली एक हजार 620 रुपयांची मागणी केली. याबाबत नागरीकांनी माझ्याशी संपर्क केला असता मी नगरपरीषदेला लेखी स्वरुपात निवेदन देऊन नळ धारक यांच्याकडे थकबाकी नसून नळ जोडणी करतांना नगरपालिकेने आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क घेतले आहे. तेच मागील वर्षाची पाणीपट्टी जमा झाली असून त्याचे समायोजन करावे, अशी मागणी केली आहे. समायोजन न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात येईन, असे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !