भुसावळ सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे रक्तदान शिबिर


भुसावळ : सेंट्रल रेल्वे मजदूर संघ मंडळ परीषद, भुसावळ यांच्या सौजन्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त व सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ.आर.पी.भटनागर यांच्या जन्म दिवसानिमित्त मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिराचे आयोजन 6 रोजी रेल्वे हॉस्पिटलला करण्यात आले.

200 दात्यांनी केले रक्तदान
यावेळी 200 कर्मचार्‍यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अपर मंडल रेल प्रबंधक एस.के.सुमन, सहाय्यक कार्मिक अधिकारी अतुल कुमार रायकवार उपस्थित होते. रक्तदान शिबिरामधे मंडल समन्वयक एस.के.दुबे, मंडल सचिव (वर्कशॉप) किशोर भागवत कोलते, महिला मंडल अध्यक्ष अलका चौधरी, पीओएच सचिव अजित अमोडकर, संजय भारंबे, नागेश शुक्ला, आर.के.मेघवाल, भूपेंद्र रणधीर, राकेश कुमार यादव, गणेश कुमार सिंह यांची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !