केर्‍हाळेत खळबळ : नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या


Excitement in Kerala : Suicide of a minor student of class IX रावेर : नवव्या इयत्तेत शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेतला. ही घटना रावेर तालुक्यातील केर्‍हाळे येथे शनिवारी रात्री 8 वाजेच्या पूर्वी घरात घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नंदिनी महाजन असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
भाजीपाला विक्री करून नंदिनी ही आपली आजी निर्मला महाजन यांच्याकडे वास्तव्यास होती. निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री आठ वाजता घरी परतल्यावर दरवाजे बंद आढळले. त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. यावेळी नात नंदिनीने गळफास घेतल्याचे दिसले. याबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !