जलचक्र शिवारातील शेतीतून 12 हजारांचे साहित्य लंपास


12,000 worth of materials from Jalchakra Shivar agriculture बोदवड : बोदवड तालुक्यातील जलचक्र शिवारातील शेतीतून चोरट्यांनी पाणबुडीसह अन्य मिळून 12 हजारांचे साहित्य लांबवले. हा प्रकार 6 ते 7 दरम्यान घडला. याप्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
शेती साहित्याच्या चोर्‍या वाढल्याने शेतकरी धास्तावले आहेत. जगन कडू राऊत (50, जलचक्र खुर्द, ता.बोदवड) या शेतकर्‍याची जलचक्र शिवारातील शेत गट क्रमांक 114/2 मध्ये शेती आहे. चोरट्यांनी संधी साधत शेतातील विहिरीतून पाणबुडी मोटार, केबल वायर व स्टार्टर असे एकूण 11 हजार 700 साहित्य लांबवले. राऊत यांनी याप्रकरणी बोदवड पोलिसात तक्रार नोंंदवली. तपास नाईक युनूस तडवी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !