भुसावळात निघाली छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा

विश्व हिंदू परीषदेतर्फे कार्याच्या माहितीसाठी आयोजन


भुसावळ : विश्व हिंदू परीषद व बजरंग दलाच्या माध्यमातून शनिवार, 7 श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावर्षी विश्व हिंदू परीषदेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची माहिती जनमानसात व्हावी या हेतूने संपूर्ण देशभरामध्ये शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ शहरातील परीषदेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शनिवारी सकाळी 11 वाजता शनी मंदिर, जामनेर रोड भुसावळ येथून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

महिलांचा लक्षणीय सहभाग
यावेळी विश्व हिंदू परीषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लाहोटी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही यात्रा सिंधी कॉलनी, श्रीराम नगर, हुडको कॉलनी, गायत्री शक्तीपीठ, अष्टभुजा माता मंदिर, जामनेर रोड, पांडुरंग टॉकीज, विठ्ठल मंदिर वार्ड आदी भागांत जावून यात्रेचा समारोप विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल मंदिरात झाला. यात्रेमध्ये दुर्गा वाहिनीच्या मुलींची व मातृशक्तीच्या महिलांची संख्या लक्षवेधक होती.

यात्रेच्या यशस्वीतेसाठी योगेंद्र हरणे, संजय यावलकर, गणेश वाणी, दिलीप कलाल, विनोद उबाळे, कैलास गायकवाड, भाऊ पवार, वैभव पाटील, नारायण घोडके, डॉ.विरेंद्र झांबरे, राकेश शर्मा, प्रवीण सोनार, नितीन शर्मा, सोनल शर्मा, प्रसाद पांडे आदी कार्यकर्ते व दुर्गा वाहिनीच्या मुला-मुलींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !