भुसावळात तक्रार निवारण दिनात 165 अर्ज निकाली
165 applications disposed of in Bhusawla Grievance Redressal Day भुसावळ : तक्रार निवारण दिनी शहर आणि बाजारपेठ पोलिसांतर्फे 226 अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यातील 165 अर्जामध्ये तडजोड होऊन ते अर्ज निकाली निघाले.
दोन्हींमध्ये समझोता
उर्वरीत 61 अर्जावर अभ्यास करून लवकरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया केली जाणार आहे.
भुसावळ पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या तक्रार निवारण दिनात नागरीकांच्या आपसात झालेल्या तक्रारी, शेजार्यांसोबत झालेले वाद, कौटुंबिक वाद याबाबत पोलिस ठाण्यात अर्ज दाखल करण्यात आले होते, या अर्जावर शनिवारी तक्रार निवारण दिनात सुनावणी घेण्यात आली, अर्जदार व त्यांनी ज्यांच्याविरूध्द अर्ज केला आहे, त्यांना बोलावून अधिकारी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत दोन्हींमध्ये समझोता घडवून आणला त्यामुळे असे अर्ज तत्काळ निकाली निघाले.
61 अर्जांबाबत दाखल होणार गुन्हा
उर्वरीत 61 अर्जावर अभ्यास करून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू केली जाणार आहे. यात शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 33 तर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 28 अर्ज निकाली निघालेले नाही. यावेळी परीवेक्षाधीन डीवायएसपी आप्पासाहेब पवार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण, सहायक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, उपनिरीक्षक संजय कंखरे, सहायक फौजदार सय्यद इकबाल, संजय पाटील, आशा तडवी, सोपान पाटील आदी उपस्थित होते.
तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्यातील तक्रार निवारण दिन हा डीवायएसपी कार्यालयाच्या मिटींग हॉलमध्ये ठेवण्यात आला. यावेळी 140 अर्ज ठेवले होते, त्यापैकी 112 अर्ज निकाली निघाले. बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांचे सहकारी यावेळी होते. निरीक्षक आव्हाड यांनी अर्जदारांसह ज्यांच्या विरूध्द तक्रार आहे, त्यांच्याशी चर्चा केली, समस्या जाणल्या.
