वाघझिरा येथे 22 वर्षीय तरूणाची आत्महत्या


22-year-old youth commits suicide in Waghzira यावल : यावल तालुक्यातील वाघझिरा येथे एका 22 तरुणाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
वाघझिरा, ता.यावल येथील रहिवासी दीपक बदा पावरा (22) या तरुणाने आपल्या राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.नम्रता अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार उमेश महाजन करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !