डांभूर्णीतील 45 वर्षीय इसमाची विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या


45-year-old Isma from Dambhurni committed suicide by consuming poisonous substances यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे 45 वर्षीय इसमाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यास तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विषारी द्रव पदार्थ केला सेवन
डांभूर्णी, ता.यावल येथील रहिवाशी संजय एकनाथ कोळी (45) याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार हा निदर्शनास येताच त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णालयाचे डॉ.निरंजन देशमुख यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !