भुसावळात मोबाईल रीचार्ज न झाल्याच्या वादातून एकाला मारहाण
A man was beaten up in Bhusawal due to a dispute over not recharging his mobile phone भुसावळ : मोबाईल रीजार्च करण्यासाठी पैसे दिल्यानंतर रीजार्च न झाल्याने ग्राहकाने पैसे परत मागितले व त्यातून दुकानदाराशी वाद झाला. त्यानंतर शहरातील तरुणाला शिविगाळ करीत ारहाण करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मारहाण प्रकरण
मुस्तकीन शेख मुक्तार (24, शिवाजी नगर, आगाखान वाडा, भुसावळ) हा तरुण रविवार, 8 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता मोबाईलमध्ये रीचार्ज करण्यासाठी शहरातील कुमार किराणा दुकानाजवळील एका दुकानात गेला. दुकानदाराला पैसे देवूनही मोबाईल रीचार्ज न झाल्याने दुकानदार फरहान शेख नसीम याला रीचार्जचे पैसे मागितले व त्यातून शाब्दीक वाद वाढत गेला. दुकानदार फरहान शेख नसीम आणि फरदीन शेख नसीम (दोन्ही रा.आगाखान वाडा, भुसावळ) यांनी मुस्तकीन शेख यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यात मुस्तकीन हे जखमी झाले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात आरोपी दुकानदार फरहान शेख नसिम आणि फरदीन शेख नसीम (दोन्ही रा.आगाखान वाडा, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अन्वर शेख करीत आहे.


