भुसावळात अतिक्रमण हटाव मोहिमेपूर्वीच अनेकांनी हटवल्या टपर्‍या ; आजपासून मोहिम

यावल रोडसह जामनेर रोड होणार अतिक्रमण मुक्त ; पोलिसांच्या फौजफाट्यात होणार कारवाई


Even before the encroachment removal campaign in Bhusawal, many people removed the tapirs ; campaign from today भुसावळ  : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याने पालिकेने यावल रोड व जामनेर रोड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी गुरुवार, 11 रोजी सकाळी 10 वाजेपासून अतिक्रमण मोहिम राबवण्याची तयारी केली आहे. दरम्यान, मोहिमेदरम्यान टपर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी यावल रोडवरील व्यावसायीकांनी टपर्‍या व अतिक्रमण शेड हटवल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, दोन टप्यात अतिक्रमण निघणार असून पहिल्या टप्यात राहुल नगर ते महाराणा प्रताप चौक, शहर पोलिस ठाण्यासमोरील परीसर, न्यायालयामागील परीसर तसेच जळगाव रोडवरील, नाहाटा चौफुली परीसर अतिक्रमणमुक्त केला जाणार आहे.

बाजारपेठेत दिवाळीनंतर होणार कारवाई
पालिकेच्या माध्यमातून गेल्या सोमवारपासून शहरातील अतिक्रमणावर हातोडा पडणार होता मात्र आमदार संजय सावकारे यांनी पुढाकार घेत प्रशासनाशी चर्चा करून दिवाळीपर्यंत कारवाई करू नये, अशा सूचना केल्या होत्या त्यामुळे तूर्त बाजारपेठेतील अतिक्रमण निघणार नाही मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या व टपर्‍या उभ्या करण्यात आल्याने हे अतिक्रमण हटवून रस्ते अतिक्रमणमुक्त केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील हातगाड्या, टपर्‍या काढण्यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक होवून त्यात नियोजन करण्यात आले.



यावल रोडवर सर्वाधिक अतिक्रमण
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष करून शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर लावण्यात आलेल्या खाद्य पदाथार्र्ंच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे व त्यामुळे मोठा अपघात होण्याचीदेखील भीती आहे. अनेकांनी तर पक्के अतिक्रमण करून शेडदेखील बांधल्याने या रस्त्यावरून पायी चालणेदेखील कठीण झाले आहे त्यामुळे राहुल नगर ते महाराणा प्रताप चौकापर्यंतचा मार्ग मोकळा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. प्रांताधिकारी पाटील यांनी स्वतः दुचाकीवरून शहरातील अतिक्रमणाचा आढावा घेत अतिक्रमण हटवण्याचे सुक्ष्म नियोजन केले आहे.

ध्वनीक्षेपकाद्वारे दिल्या सूचना
भुसावळ पालिकेच्या माध्यमातून रस्त्यावरील गाड्या व्यावसायीकांनी स्वत: हटवून घ्याव्यात यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे बुधवारी व्यावसायीकांना सूचना करणयात आल्या. व्यावसायीकांनी स्वत: त्यांच्या गाड्या, टपर्‍या काढून घ्याव्यात अन्यथा पालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जाईल व होणार्‍या नुकसानीची जवाबदारी व्यावसायीकांची असेल, असे पालिका प्रशासनाने बजावले आहे.

नाहाटा चौफुली घेणार मोकळा श्वास
भुसावळ शहरातील पु.ओ.नाहाटा चौफुलीच्या परीसरात असलेल्या पान टपर्‍या, हातगाड्या, खाद्य पदार्थांची दुकाने तसेच अतिक्रमण ते गुरुवारपासून हटवले जाणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा, सिगारेट, तंबाखूची विक्री होते शिवाय या भागात महाविद्यालय असल्याने टवाळखोरांची संख्यादेखील वाढत असल्याने अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना या भागातून वळण घेतानाही कसरत करावी लागते मात्र अतिक्रमण हटणार असल्याने नाहाटा चौफुली मोकळा श्वास घेणार आहे.

पालिका कर्मचार्‍यांसह पोलिसांचा बंदोबस्त
भुसावळ पालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी 50 कर्मचारी सज्ज असतील तसेच जेसीबी, ट्रॅक्टर आदींचादेखील त्यासाठी वापर करण्यात येणार आहे शिवाय भुसावळ पोलिस प्रशासनातर्फे दोन दुय्यम अधिकारी तसेच दहा पोलिसांचा बंदोबस्त देण्यात येत असल्याचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !