उचंदा येथील नवविवाहितेची विवाहितेची आत्महत्या : पतीसह तिघांविरोधात गुन्हा
Suicide of a newlywed in Uchanda : Crime against three people including husband
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा आरोपींना अटक करण्यात आली.
दोघा आरोपींना अटक
निकिता शंकर भालशंकर (17, उचंदा) या विवाहितेला सासरच्या मंडळींनी 12 ऑक्टोंबरच्या 15 महिन्यांपूर्वी वेळोवेळी शारीरीक व मानसिक त्रास दिला तसेच तिला मारहाण केल्याने विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी मयताची आई प्रमिला संतोष सवर्ण (36, निंभोरासीम) यांच्या फिर्यादीवरून दीपक अरुण भालशंकर, अरुण धोंड भालशंकर (दोन्ही रा.उचंदा) व सोनी विजय बिर्हाडे (दसरखेडा, ता.मलकापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप चेढे करीत आहेत.


