चारधाम तीर्थयात्रा करून परतलेल्या भुसावळातील भाविकांचे जंगी चारधाम तीर्थयात्रा करून परतलेल्या भुसावळातील भाविकांचे जंगी स्वागत


Bhusawal pilgrims returning from Chardham Pilgrimage भुसावळ : शहरातील बियाणी एज्युकेशने ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी हे त्यांच्या परीवार, मित्र मंडळी व समाजबांधवांसह चारधाम तीर्थयात्रेसाठी भुसावळातून 1 ऑक्टोबर रोजी रवाना झाले होते. अतिशय खडतर रस्ता व कठीण प्रवास , खराब हवामानाचा सामना करीत हरीद्वार, ऋषीकेश, गंगोत्री, यमोनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ आदी तीर्थक्षेत्राची यात्रा त्यांनी सुखरुप पार पाडली व शनिवारी त्यांचे भुसावळा आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

या भाविकांचे सहर्ष स्वागत
शनिवारी भुसावळात मनोज बियाणींसह डॉ.संगीता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी व त्यांचे मित्र परीवार परतल्यानंतर भुसावळच्या रेल्वे स्थानकावर ढोल-ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत समाजबांधव व नातेवाईकांनी केले. रेल्वे स्थानकावर कांताबाई बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रूपेश भांगडिया, संकेत लढ्ढा, राधेश्याम लाहोटी, गोपाळ ठाकूर, प्रवीण भराडीया, मनोज माहेश्वरी, किशोर कोलते, नितीन नंदवणे आदी उपस्थित होते.

बियाणी मिलिटरी स्कूलमध्येही स्वागत
मनोज बियाणी हे सहपरीवार बियाणी मिलीटरी स्कूलमध्ये दाखल होताच त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. रस्त्यावर जागो-जागी त्यांचे औक्षण करण्यात आले. शाळेचा परीसर सजवण्यात आला होता. जागो-जागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जय भोले, ओम नमं शिवाय, जय बद्रीनाथ, जय केदारनाथ अशा घोषणा देण्यात आल्या. कलश धारी विद्यार्थीनीचे विशेष आकर्षण होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !