किनगाव गावातून दुचाकी चोरी : चौघांना यावल पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Two-wheeler theft from Kingaon village : Yaval police handcuffed four यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील मुख्य चौकातून दुचाकी चोरीप्रकरणी यावल पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली. चौघांना येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
चोरी प्रकरणी चौघांना बेड्या
किनगाव बुद्रुक, ता.यावल येथील मुख्य चौकात गोपाळ बारी यांच्या घरासमोर कैलास युवराज वराडे यांनी आपली दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 ए.एच.6557) ही लावली असता संशयित फकीरा कोळी, फारूख तडवी (दोघे रा.किनगाव) व अजय सावळे (रा.नायगाव) या तिघांनी दुचाकी लांबवून ती विक्रीसाठी हर्षल गोकुळ भालेराव (रा.जुने जळगाव) यास दिली.


याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता चौघांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास हवालदार नरेंद्र बागुले, वासुदेव मराठे करीत आहेत.
