भुसावळातील श्री राधाकृष्ण प्रभातफेरीतर्फे महाराज अग्रसेनजी महाराज जयंती उत्साहात
Maharaj Agrasenji Maharaj Jayanti by Shri Radhakrishna Prabhatferi in Bhusawal भुसावळ : शहरातील श्री राधाकृष्ण प्रभातफेरीतर्फे महाराज अग्रसेनजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजजवळील श्री छत्रपती महाराज अग्रसेनजी महाराज यांच्या पुतळ्याला श्री राधाकृष्ण प्रभातफेरीतर्फे माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शेकडो प्रभात फेरीतील बंधू-भगिनी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्यामजी लाहोटी, श्यामसुंदर काबरा, प्रा.मनोज माहेश्वरी, अनुप अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, श्याम अग्रवाल, संजय अग्रवाल, जे.बी.कोटेचा, पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरीत शहर स्वच्छ शहरची संकल्पना राबविणारे नाना पाटील, सूचित, जी.आर.ठाकूर (मामा), संजय फालक, राजू जयस्वाल, विनोद शर्मा, सुनील लाहोटी, संजय चांडक, हरी प्रकाश अग्रवाल, विनोद राठोड, नरेंद्र लड्ढा, मदनजी बोरकर, गोपाल जांगीड, महेश भालेराव, सोपान चौधरी, संजय मंत्री, विजय काबरा, प्रदीप झांबरे आदींची उपस्थिती होती.


