भुसावळातील र.नं.मेहता विद्यामंदिरात पौष्टिक तृणधान्य उपक्रम
भुसावळ : शहरातील श्री.र.नं. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता चौथी इंग्रजी माध्यम या वर्गातील विद्यार्थिनीने अन्नपूर्णा मातेची वेशभूषा परीधान करून अन्न व त्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करणारा संदेश दिला. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध अन्नधान्य व तृणधान्ये यांच्या चित्ररूपी तसेच विविध तक्त्यांच्या स्वरूपात मार्गदर्शनपर तक्त्यांची निर्मिती केली तसेच इयत्ता पहिली, दुसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पोषण आहाराबद्दल भाषण दिले. हिंदी सेवा मंडल पदाधिकारी एम.डी. तिवारी, रमेश नागराणी, प्रधानध्यापिका रीता शर्मा यांनी उपक्रमाचे निरीक्षण व कौतुक केले. शिक्षक व कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
