किनगावात आरोग्य मेळावा : चार हजार रुग्णांची तपासणी
डांभूर्णी : किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ..मनिषा महाजन यांच्या संकल्पनेतून व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, 8 रोजी आयुष्यमान भव अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी मेळावा किनगाव आरोग्य केंद्रात झाला. या आरोग्य मेळाव्यात किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्या सर्व उपकेंद्रातील एकूण तीन हजार 967 नागरीकांची आरोग्याची तपासणी करण्यात आली.
या आरोग्य मेळाव्याला चोपडा विधानसभेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी भेट दिली. आरोग्य मेळाव्यात सर्व तपासण्या मोफत असल्यामुळे हजारो ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. महालॅबकडून सर्व रक्त तपासणी मोफत करण्यात आल्या व येथे रक्तदान शिबिरही घेण्यात आले. या शिबिरात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने त्यांना 50 हजारांचा अपघाती विमा तत्काळ देण्यात आला. या आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत 27 आभा कार्ड काढण्यात आले व पाच ग्रामस्थांनी अवयवदानाची नोंदणीही केली.

यांनी शिबिरात दिली सेवा
तालुका क्षयरोग व कुष्ठरोग अधिकारी डॅ.तायडे, निरामय हॉस्पिटलचे डॉ.देशपांडे, बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रशांत जावळे, डॉ.दीपक चौधरी, दंतरोग तज्ञ डॉ.स्नेहल जावळे, डॉ.वराडे, डॉ.दौलत निमसे, चांडक हॉस्पिटलचे डॉ.निलेश चांडक, कांताई नेत्रालय, रेडक्रॉस सोसायटी यांच्यासह पियुष हॉस्पिटलचे डॉ. रोहन पाटील, रजनिगंधा हॉस्पीटलचे अस्थीरोग तज्ञ डॉ.अभिजीत पाटील, कॅन्सर तज्ञ डॉ.प्रशांत चोपडा, डॉ.सागर पाटील, डॉ.प्रफुल काबरा, जनरल फिजिशियन, डॉ.सुनील सूर्यवंशी, बालरोग तज्ज्ञ डॉ.हेमंत पाटील आदींची उपस्थिती होती.
शिबिर यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
शिबिर यशस्वीतेसाठी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन, डॉ.तरन्नुम शेख, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अश्फाक शेख, डॉ.वकार शेख, डॉ.मोहसीन शेख, डॉ.धनंजय जोशी, डॉ.सोनल भंगाळे, आरोग्य सहायिका मंगला सोनवणे, आरोग्य सहायक सुरवाडे, लिपिक जावेद जमादार, आरोग्य सेविका कविता सपकाळे, मोहिनी धांडे, आफरीन तडवी, शीला जमरा, नवादी बारेला, सुजाता सोनवणे, आरोग्य सेवक दीपांकर बर्डे, जे.के.सोनवणे, मनोज बारेला, पवन काळे, शिपाई सरदार कानाशा, पियुष बैरागी, वाहन चालक कुर्बान तडवी, सफाई कर्मचारी गोपी सपकाळे, स्वयंसेवक मिलिंद जंजाळे, आरोग्य केंद्रातील सर्व आशा वर्क आदींनी परीश्रम घेतले.


