यावल तालुका ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदासाठी एकमेव अर्ज


यावल : यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व नऊ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी लोकनियुक्त सरपंच पदाकरीता एकमेव अर्ज प्राप्त झाला. निवडणुकीकरीता ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येत असून निवडणूक आयोगाची संकेतस्थळदेखील व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार इच्छुक उमेदवारांनी केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत शुक्रवार, 20 ऑक्टोंबरपर्यंत आहे.

निवडणुकीमुळे ग्रामीणमध्ये तापले वातावरण
यावल तालुक्यात मुदत संपलेल्या 10 ग्रामपंचायतीमध्ये 10 लोकनियुक्त सरपंच सह 92 सदस्य पदासाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. विविध कारणाने रीक्त असलेल्या नऊ ग्रामपंचायतीमध्ये एक लोकनियुक्त सरपंचांसह 14 सदस्यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी कासारखेडा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदाकरीता एकमेव अर्ज प्राप्त झाला. अर्ज स्विकारण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यावल तहसील कार्यालयात उपस्थित आहेत. निवडणुकीत ऑनलाईन अर्ज दाखल करायचे असून निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व्यवस्थित काम करत नसल्याची ओरड इच्छुक उमेदवार करीत आहे. निर्धारीत शुक्रवार, 20 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या वेळेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळणे देखील अपेक्षीत असल्याने संकेतस्थळाची गती वाढवण्याची मागणीदेखील होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !