मोबाईल टॉवरचे साडेनऊ लाखांचे साहित्य लांबवले : जळगावातील तिघांना अटक


Mobile tower materials worth nine and a half lakhs delayed : Three arrested in Jalgaon भुसावळ  : मोबाईल टॉवर उभारणीचे सुमारे साडेनऊ लाख रुपये किंमतीचे साहित्य लांबवल्याप्रकरणी कंपनीतील तिघांना वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे.

परप्रांतीय तिघांना बेड्या
शिवेंद्र श्रीकेशरीप्रसाद द्विवेदी (43, वॉर्ड क्रमांक सहा, पहिलपार रोड, कटरा, नवी दिल्ली) यांच्या फिर्यादीनुसार, 6 ते 14 ऑक्टोंबरदरम्यान संशयितांना मोबाईल टॉवर उभारणीचे साहित्य देण्यात आले होते मात्र संशयितांनी या साहित्याची संगनमत करीत परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची नऊ लाख 37 हजार 158 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी संशयित भूपेंद्र ओमप्रकाश जमरे, विशाल कुमार विजयकुमार, अरविंद दुर्गाप्रसाद गौंड (तिघे रा.ह.मु.वाघनगर, जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे .तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !