जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरातील 31 वर्षीय महिलेची आत्महत्या


Suicide of a 31-year-old woman in Harivthal Nagar area of ​​Jalgaon city जळगाव : 31 वर्षीय महिलेने अज्ञात कारणातून गळफास घेतला. ही घटना हरीविठ्ठल नगरात मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. सपना उर्फ स्वप्ना जगदीश भोई (31, हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अज्ञात कारणातून गळफास
जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात सपना जगदीश भोई ही महिला मजुरी करून एकटीच वास्तव्यास होती. मंगळवारी सपना भोई यांनी साडीने गळफास घेतला. रात्री 9 वाजता त्यांची बहिण मंगलाबाई ढोले या सपना यांच्याकडे आल्यानंतर त्याना बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी मोठा आक्रोश केला. स्थानिकांनी मृतदेह खाली उतरवत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला असता वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य साळुंखे यांनी मयत घोषीत केले. याबाबत रामानंद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार हेमंत कळसकर करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !