आव्हाणेतील 12 वर्षीय बालकाचा गिरणा पात्रात बुडाल्याने मृत्यू
A 12-year-old boy from Awana died after drowning in a mill tank जळगाव : गिरणा नदीपात्रात बुडाल्याने आव्हाणेतील 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. वैभव नरेंद्र पाटील (12, आव्हाणे) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीला आली. खेळताना चिमुकल्याचा पाय घसरल्याची शंका आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
खेळताना पाय घसरून बुडाला बालक
सहाव्या इयत्तेत शिक्षण घेणारा वैभव पाटील हा आपल्या आई-वडील व लहान भाऊ यांच्यासह आव्हाणे येथे वास्तव्याला होता. मंगळवारी दुपारी मित्रांसोबत खेळण्यासाठी वैभव निघून गेला मात्र सायंकाळ होवूनही तो घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू असताना जळगाव तालुका पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.


मंगळवारी दुपारच्या वेळेस गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना वैभवला अनेकांनी पाहिल्यानंतर खातरजमा करण्यासाठी नातेवाईकांसह धीरज पाटील व स्वप्नील जोशी हे बुधवारी नदीपाात पोहोचल्यानंतर गिरणेच्या वरच्या भागातील पात्रात वैभवचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे वैभवचा मृतदेह पाहताच आई-वडीलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तालुका पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. वैभवच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परीवार आहे. माजी पोलिस पाटील उत्तम पाटील यांचा नातू होय.
