शौकीन चोरट्याला जळगावातील नमकीनची भुरळ : गोदामातून एक लाख 60 हजारांचा माल लांबवला
Jealousy of Jalgaon Namkeen to a hobbyist thief : goods worth one lakh and 60 thousand were stolen from the godown जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच आता चोरट्यांनी चक्क नमकीनच्या गोदामाला टार्गेट करीत एक लाख 60 हजारांचा माल लांबवला. हा प्रकार 7 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एकाविरोधात गुन्हा दखल करण्यात आला.
चोरट्यांनी गोदाम फोडून माल लांबवला
वैशाली दिनेश वाणी (42, मोहन नगर, मोहाडीरोड, जळगाव) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बालाजी नमकीनचा व्यवसाय असून त्यांचे नेहरू नगरातील दत्त मंदीराजवळ गोदाम आहे. 6 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर रोजीच्या दरम्यान संशयित आरोपी सचिन मुकुंदा साळवे (रा. खंडेराव नगर, जळगाव) याने गोडावूनमधून सुमारे 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर 10 दिवसांनी मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी सचिन मुकुंदा साळवे (रा. खंडेराव नगर, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सचिन पाटील करीत आहे


