रावेरात केळी फळ पीक विम्याची नुकसान भरपाईसाठी उपोषण


Fasting for compensation of banana fruit crop insurance in Raver रावेर : केळी उत्पादक शेतकर्‍यांना केळी पीक विम्याची रक्कम मिळावा, या मागणीसाठी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांनी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बुधवारपासून रावेरात आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. हवामानावर आधारीत केळी फळ पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी रावेर तालुका शेतकरी संघर्ष समितीतर्फे बुधवारी रावेर येथील तहसील कार्यालयासमोर दुपारी दोन वाजता आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित केळी उत्पादक शेतकर्‍यांनी घोषणा दिल्या. केळी फळ पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, कोण म्हणते देत नाही नुकसान भरपाई घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा जोरदार घोषणाबाजीने परीसर दणाणला.

यांची होती उपस्थिती
यावेळी जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, कृऊबा संचालक योगीराज पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, पितांबर पाटील, गणेश महाजन, जयेश कुयटे, शशांक पाटील, गणेश चौधरी, किशोर चौधरी, प्रणित महाजन यांनी मनोगतात केळी विमा मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली. प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, सुरेश पाटील, निलेश पाटील, गोंडू महाजन, जनाबाई महाजन, योगीता वानखेडे, पी.आर.पाटील, मधुकर पाटील, नितीन पाटील, शैलेंद्र पाटील, वासुदेव पाटील, मुकेश पाटील, राहुल महाजन, अमोल प्रकाश पाटील, श्रीकांत चौधरी, संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरीबांधव उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !