महिलेचा व्हिडीओ बनवला : जळगावात तरुणाला चोपले


A video was made of a woman : A young man was bitten in Jalgaon जळगाव : रस्त्यावरून पायी जाणार्‍या महिलेचा व्हिडीओ काढून छेडखाणी करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका तरुणाला महिलेसह नागरीकांनी जोरदार चोप दिला. ही घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात संबधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
कोंबडी बाजार भागातील खंडवा कटलरी या दुकानात आरीफ खाटीक (31) हा तरुण कामाला आहे. गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुकानाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून एक महिला आपल्या मैत्रिणीसोबत जात असताना संशयित आरीफ खाटीक याने व्हिडीओ केला असल्याचे महिलेच्या लक्षात आले.



महिलेने दिलेल्या माहितीनुसार तरुणाने व्हिडीओ केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने संबधित तरुणाला विचारणा केली असताना, त्या तरुणाने व्हिडीओ करत नसल्याचे सांगितले मात्र फोन तपासला असताना, डीलीट केलेल्या फंक्शनमध्ये हा व्हिडीओ आढळून आला. त्यानंतर त्या तरुणाने महिलेशी अरेरावी केली. हा प्रकार परिसराती काही नागरिकांना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलेच बदडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !