आत्महत्यांचे सत्र थांबेना : जळगावात 36 वर्षीय तरुणाची आत्महत्या
The suicide season does not stop : 36-year-old youth commits suicide in Jalgaon
जळगाव : शहरात आत्महत्या करण्याचे सत्र थांबायला तयार नाही. सातत्याने होणार्या घटनांनी समाजमन हळहळले आहे. जळगाव शहरातील वाघ नगरातील 36 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दिनेश मधुकर शिरसाठ (36, रा.वाघ नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
घरी कुणी नसताना घेतला गळफास
दिनेश हा वाघ नगरात आई व पत्नीसह वास्तव्याला होता. दिनेश डॉमिनोज पिझ्झा येथे काम करीत होता तर पत्नी एका ब्युटी पार्लरमध्ये जॉबला आहे. गुरुवार, 19 रोजी दुपारी दिनेश घरी आल्यानंतर तो जेवण करून वरच्या खोलीत गेला. त्यानंतर तो खाली उतरला नाही त्यामुळे कुटुंबीयांनी दुपारी चार वाजता वरच्या मजल्यावर खातरजता केली असता दिनेशने गळफास घेतल्याचे दिसून येताच कुटुंबीयांनी आक्रोश केला.


आत्महत्येचे कारण अस्पष्ट
नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास तपासणीअंती मयत घोषित केले. जळगाव तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
