रावेरात संतप्त शेतकर्‍यांनी काढली राज्य सरकारची प्रेतयात्रा

केळी फळ विमा रकमेच्या मागणीसाठी दुर्लक्षामुळे केळी उत्पादक संतप्त


In Ravera, angry farmers took out the state government’s obituary रावेर : केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या केळी पीक विमा रकमेच्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी शुक्रवारी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. या अंत्ययात्रेत शेकडोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

तिसर्‍या दिवशी उपोषण सुरू
केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या केळी पीक विम्याच्या रक्कमेसाठी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांनी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बुधवारपासून उपोषण छेडण्यात आले आहे. हवामानावर आधारीत केळी फळ पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम त्वरीतत मिळावी या मागण्यासाठी तालुका शेतकरी संघर्ष समिती रावेर येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकर्‍यांनी शुक्रवारी दुपारी सरकारची प्रेतयात्रा काढली.


यांचा आंदोलनात सहभाग
रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सरकारच्या प्रेतयात्रेला सुरूवात झाली. रावेर तालुका शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. युवा नेते धनंजय चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक योगीराज पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, पितांबर पाटील, गणेश महाजन, जयेश कुयटे, माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी, रावेर पीपल्स बँक संचालक सोपान साहेबराव पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, सुनील कोंडे, शशांक पाटील, गणेश चौधरी, प्रहारचे सुरेश पाटील, सुरेश शिंदे, उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित, अरविंद गांधी, योगेश सोपान पाटील, रवींद्र पाटील, धीरज पाटील, प्रदीप पाटील, घनश्याम पाटील, रमेश वैदकर, प्रणीत महाजन, राजू सवर्णे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. उपोषण स्थळाजवळ प्रेतयात्रेचे सभेत रूपांतर झाले. यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य रमेश पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. केळी फळ विम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला मान्यवर आणि शेतकर्‍यांनी पाठिंबा दिला.

घोषणांनी परीसर दणाणला
यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी घोषणा दिल्या.केळी फळ पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे ,कोण म्हणते देत नाही नुकसान भरपाई घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. फौजदार सचिन नवले, राजेंद्र करोडपती, सुनील वंजारी, पुरुषोत्तम पाटील आणि सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !