महाभियोग खटल्यातून डोनाल्ड ट्रम्प निर्दोष
वॉशिंग्टन : महाभियोग खटल्यातून डोनाल्ड ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अधिकारांचा गैरवापर व संसदेच्या कामात अडथळे या आरोपांवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदच्युत करण्यासाठी महाभियोगाची कारवाई 21 जानेवारीपासून सिनेटमध्ये सुरू झाली. महाभियोगास सामोरे जावे लागणारे ट्रम्प हे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रम्प यांच्या रीपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत असल्याने महाभियोगात दोषी ठरून त्यांच्यावर हकालपट्टीची नामुष्की येण्याची शक्यताही कमी होती. त्यानंतर आता सिनेटने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळून लावत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. रीपब्लिकन पक्षाने 52-48 च्या अंतराने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळले.